आष्टा येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ४ बूथ समितींच्या बैठकांमध्ये मार्गदर्शन

27 Aug 2018 , 07:00:07 PM

आष्टा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ४ बूथ समितींच्या बैठका घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. आपण आपल्या बूथमधील प्रत्येक कुटुंबाशी संवाद ठेवत, त्यांचे छोटे-छोटे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करा, असा संदेश पाटील यांनी बूथ समितीतील कार्यकर्त्यांना दिला. आपण स्वतः आष्टा, इस्लामपूरसह मोठ्या गावातील बूथ समित्यांच्या बैठका घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जयंत पाटील यांनी भाषणास फाटा देत बूथ समितींच्या कार्यकर्त्यांची थेट हजेरी घेत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कोणाला काही बोलायचे आहे का? अशी विचारणा करताच एका आजीने आमचे गॅसला नाव नाही, घरकुलला नाव नाही. मात्र मतदानास नाव आहे, अशी व्यथा व्यक्त केली. हा धागा पकडत पाटील म्हणाले की, आपले हे प्रश्न सोडविण्यासाठीच या बुथ समित्या केल्या आहेत. 

या बैठकांना आष्टा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार विलासराव शिंदे, नगराध्यक्षा सौ.स्नेहल माळी, उपनागराध्यक्षा सौ.रुक्मिणी अवघडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील,माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश रुकडे, संचालक विराज शिंदे, दूध संघाचे माजी उपाध्यक्ष संग्राम फडतरे, संचालक माणिक शेळके,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,संग्राम पाटील आजी-माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख