राष्ट्रवादीची प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्हाध्यक्षांची नवीन यादी जाहीर

27 Aug 2018 , 08:16:15 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आणखी एक यादी आणि दोन जिल्हाध्यक्ष आणि एका कार्याध्यक्षाची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची २०१८-२०२० पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक होऊन यापूर्वी ५० जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदाची चौथी यादी आता जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये मालेगाव जिल्हाध्यक्ष-मुफ्ती मोहम्मद ईस्माईल, गडचिरोली- जिल्हाध्यक्ष- रवींद्र वासेकर, कार्याध्यक्ष- प्रकाश ताकसांडे आदी तर प्रदेश कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे - उपाध्यक्ष- प्रकाश सोळंके- बीड, मोहम्मद खान-पठाण-नांदेड, अरुण गणपती लाड-सांगली, मानसिंगराव उदयसिंगराव गायकवाड-कोल्हापूर, सरचिटणीस-अमरसिंह पंडीत-बीड, सुरेश पोरेड्डीवार-गडचिरोली, राजेंद्र कोठारी-अहमदनगर, दिलीप खैरे-नाशिक, चिटणीस-सय्यद युसुफ अली-अकोला, बंडु उमरकर-नागपूर, हरिहर भोसीकर-नांदेड, मसुद शेख ईस्माईल-उस्मानाबाद, हनुमंतराव देसाई-सांगली, विनोद हरिणखेडे-गोंदिया, बाबासाहेब पंडीतराव पाटील-कोल्हापूर, संघटक सचिव-राजेश भरत लाटकर-कोल्हापूर, अविनाश गोटमारे-नागपूर, ताजुद्दीन तांबोळी-सांगली, श्रीमती वर्षा निकम-यवतमाळ, प्रा.आण्णासाहेब नरसू क्वाणे-कोल्हापूर, युनुस शेख-गडचिरोली, डॉ.सचिन मंडलिक-मुंबई, कार्यकारिणी सदस्य-भास्करराव काळे-बुलढाणा आदींचा समावेश आहे.

प्रदेश कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची आणि जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.

संबंधित लेख