काँग्रेसचे संजय खोडके यांचा खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

28 Aug 2018 , 06:24:01 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. यावेळी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

एखाद्या संघटनेत काम करत असताना काही जण पडद्याच्या पुढे राहून काम करत असतात तर काही जण पडद्याच्या मागे राहून काम करतात, पडद्याच्या मागे राहून काम करणाऱ्यांचे योगदान मोठे असते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून ज्यांनी पडद्यामागून योगदान दिले त्यात संजय खोडके यांचे नाव येते अशी स्तुती शरद पवार यांनी खोडके यांच्याबाबत बोलताना केली. खोडके इतकी वर्षे काँग्रेसमध्ये काम करत होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकाच विचारांनी काम करते. त्यामुळे खोडके काही विचारांनी लांब गेलेले नव्हते असेही ते म्हणाले. शरद पवार यांनी संजय खोडके यांचे पक्षात स्वागत करत भविष्यात अमरावतीत पक्ष वाढीसाठी खोडके यांचा नक्कीच उपयोग होईल अशी भावना व्यक्त केली.

संबंधित लेख