स्त्रियांची बेअब्रू करणार्‍या जात पंचांविरोधात ‘यशस्विनी’तर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन

06 Feb 2016 , 04:38:12 PM

जात पंचायत हा पुरोगामी महाराष्ट्रावरील कलंक आहे. वेळोवेळी जात पंचायतींनी महिलांवर अन्याय करत अपमानास्पद वागणूक दिली आहे. नुकत्याच नंदूरबार जिल्ह्यात नंदूरबार जिल्ह्य़ातील जात पंचांनी विधवा महिलेला पंचांसमोर विवस्त्र नाहणे, गव्हाच्या पिठाचे गरम केलेले गोळे अंगावर फेकणे आणि सुया टोचणे आदी अमानवी परीक्षा तिला द्यायला लावल्या
इतकेच नव्हे तर तिच्या १२ वर्षाच्या मुलाला विस्तवावर तापवलेली कुर्‍हाड घेऊन ७ पावले चालायला लावले. कुर्‍हाड पडली तर किंवा हाताला फोड आहे तर त्या महिलेला व्यभिचारी समजायचे अशी विकृत अमानवीय सत्त्वपरीक्षा घेण्याची ठरवलेल्या जातपंचायतीच्या पंचांचे हे वागणे अमानुष आहे. 

मराठवाडय़ाच्या परभणी जिल्ह्यातही एका जात पंचायतीने एका कर्जदाराला कर्ज फेडता येत नसेल, तर तुझ्या पत्नीला पाठव असा अघोरी फतवा काढला व जातीबाहेर टाकण्याची धमकी दिली. 

या दोन्ही प्रकरणात स्त्रियांची बेअब्रू करणार्‍या जात पंचांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी यशस्विनी सामाजिक अभियानच्या वतीने करण्यात आले. यशस्विनी सामाजिक अभियानच्या यशस्विनी  समन्वयकांनी मा.निवासी उपजिल्हाधिकारी हुलवळे यांना निवेदन दिले. 

संबंधित लेख