मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या नूतन प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न

31 Aug 2018 , 06:26:16 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेसची नूतन प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पहिलीच बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात घेण्यात आली.

या बैठकीत पक्षवाढ आणि पक्षबांधणी शिवाय आगामी निवडणुका लक्षात घेता त्यावर महत्त्वपूर्ण चर्चाही करण्यात आली. याशिवाय या बैठकीमध्ये राज्यात मानव अधिकार कार्यकर्ते व लेखक, विचारवंतांची सरकारकडून सुरु असलेल्या अटकसत्राचा निषेधाचा ठराव सरचिटणीस बसवराज पाटील-नागराळकर यांनी मांडला आणि अनुमोदन सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख जयदेव गायकवाड यांनी दिले. याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरही चर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली.

या प्रदेश कार्यकारिणी बैठकीला कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, उपाध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष राजेंद्र शिंगणे, उपाध्यक्ष प्रकाश सोळुंके, आमदार विदया चव्हाण, सरचिटणीस बसवराज पाटील-नागराळकर, सरचिटणीस रणजितसिंह मोहिते पाटील, संजीव नाईक, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बालबुधे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर आदींसह पक्षाचे प्रदेशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख