सरकारला उत्तरं देण्यास भाग पाडूया

04 Sep 2018 , 06:59:18 PM

चला विचारुया "५६ इंचाच्या छातीवाल्यांना ५६ प्रश्न"
मोठमोठे दावे करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांचे फुगे कधीच फुटले आहेत. अच्छे दिनचे निव्वळ बुडबुडे सोडून सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये काहीच ठोस काम केलेले नाही.
नोटबंदी, महागाई, इंधनाचे वाढते दर याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सुरक्षितता, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न, जातीयवाद, लोकशाही विचारांची पायमल्ली असे अनेक प्रश्न समोर आहेत आणि सामान्य जनतेसाठी जगण्याची लढाई दिवसेंदिवस अवघड होत आहे.
हे सगळे प्रश्न आता बेधडकपणे मांडण्याची आणि उत्तरांसाठी सरकारला धारेवर धरण्याची वेळ आली आहे.
समोर येऊन सरकारला जाब विचारा, आश्वासनांचा हिशोब मागा...
विचारूयात प्रश्न तुमच्या, आमच्या मनात खदखदणारे, टोचणारे.. समोर येऊन राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून सरकारला जाब विचारा.. 
हा आक्रोश, हा आवाज फक्त जनतेचा नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या लढ्यात तुमच्यासोबत आहे.
आपले प्रश्न #जवाबदो हा हॅशटॅग वापरून कमेंटमध्ये विचारा.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पोहचवतील थेट सरकारपर्यंत...
मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हा. चला, "सरकारला उत्तरं देण्यास भाग पाडूया".

संबंधित लेख