हा 'राम' नाही तर 'रावण' कदम - नवाब मलिक

04 Sep 2018 , 10:46:47 PM

घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम यांच्या रुपाने ‘रावणाचा’ चेहरा समोर आला आहे. हा राम नाही तर रावण कदम असल्याची खरपूस टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींचे अपहरण करण्याची भाषा केल्यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राम कदमांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मीडियाशी बोलताना नवाब मलिक यांनी राम कदम यांचा खरपूस समाचार घेतला. पुढे बोलताना मलिक म्हणाले की, हा महिलांचा अपमान आहे. राम कदम यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी मलिक यांनी केली.

संबंधित लेख