हेच का भाजपचे रामराज्य? - चित्रा वाघ

05 Sep 2018 , 12:19:21 AM

राम कदम यांच्या नावांमध्ये राम आहे, परंतु त्यांचे वागणे, त्यांची वक्तव्ये मात्र रावणाला शोभून दिसतील अशा पद्धतीची आहेत, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. रामाच्या नावाप्रमाणे रामाचा संयमीपणा सुद्धा त्यांच्याकडे यायला हवा होता मात्र तो आलेला नाही. ज्या पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत त्याचा करावा तितका निषेध कमी आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यात अतिशय वाईट परिस्थिती असताना सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असता, अशा पद्धतीने महिलांच्या, मुलींच्या बाबतीत बेजबाबदार वक्तव्य करणे, हे सत्ताधारी आमदारांना निश्चितपणे शोभण्यासारखे नाही. शासनाच्या या तथाकथित राम राज्यांमध्ये दिवसाला १२ महिला-मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, दिवसाला ३०-३५ मुलींना छेडछाडीला सामोरे जाणे अशासारखे अश्लाघ्य प्रकार होत असताना सत्ताधारी आमदारांची अशी बेताल वक्तव्य होतात त्याचा त्रिवार निषेध आहे, असे वाघ म्हणाल्या.

संबंधित लेख