राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना निवेदन

05 Sep 2018 , 06:15:28 PM

राज्यातील लोककलावंत, नाटयकलावंत आणि चित्रपट कलावंतांच्या विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना दिले.

या निवेदनामध्ये कलावंतांच्या महत्त्वाच्या १२ मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान निवेदन स्वीकारताना कलावंतांच्या मागण्या रास्त असून यासंदर्भात गणेशोत्सवानंतर सकारात्मक चर्चा करण्याचे आणि राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाला बैठकीला पाचारण करण्याचे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिले.

हे निवेदन देताना सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष  लक्ष्मीकांत खाबिया, मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे, शाहीर वामनराव घोरपडे, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष श्रीपाद खानोलकर, माणिक बजाज, बाबा पाटील, इक्बाल दरबार, बलभीम भोंडवे, सचिन खुस्पे, विजय तुपे आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख