पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, नवाब मलिक यांचं भाजपला प्रत्युत्तर

07 Sep 2018 , 11:08:17 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी नुकतीच #जवाबदो ही ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे. ५ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत केवळ तीन प्रश्न विचारण्यात आले आहेत. या तीन प्रश्नांतच भाजप घाबरली आहे. त्यामुळे भाजपने इतक्या लवकर घाबरून जाऊ नये, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपविरोधात जबाव दो मोहीम छेडली आहे. भाजपला या मोहिमेमुळे चांगलीच मिर्ची झोंबल्याचे दिसून येत आहे. म्हणून आतापर्यंत तीनच प्रश्न विचारले असतानाही भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र नवाब मलिक यांनी भाजपला प्रतिउत्तर देत भाजपची चांगलीच गोची केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या मोहिमेंतर्गत ५६ इंचाची छाती असलेल्या सरकारला ५६ प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

संबंधित लेख