वीज दरवाढ हे भाजप सरकारने रचलेले षडयंत्र - जयंत पाटील

15 Sep 2018 , 06:37:36 PM

एकीकडे महाराष्ट्रातील विजेची जनित्रे बंद करण्याची वेळ या सरकारने आणली आहे तर दुसरीकडे सरकारने सलग तीन-चार वेळा वीज दरवाढ केली आहे. महाराष्ट्रातील शेतीपंपांची दरवाढ करण्याचे पाप या सरकारने केले आहे. घरगुती वीज वापराचे आणि औद्योगिक वीज वापराचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे राज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण होत असल्याचे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. वीजेचे दर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दर परवडणारे नाहीत. आमच्या सरकारच्या काळात जी सबसिडी शेतकऱ्यांना आम्ही देत होतो,तीदेखील सरकारने कमी केली आहे.शेतीवर जगणाऱ्या शेतकरी वर्गाला आज पाणीही नाही आणि वीजही नाही. वीज दरवाढीमुळे शेती शेतकर्यांलना परवडणार नाही. शेतमालाला दीडपट हमीभाव देतो असे मोदीजी म्हणतात आणि वीजेची दरवाढ करून सव्वापट काढून घेतात. हे भाजप सरकारने रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप पाटील यांनी केला. याविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्य़ांना केले आहे.

संबंधित लेख