युवतींनो लढायाला शिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे - सक्षणा सलगर

15 Sep 2018 , 08:34:20 PM

अंबड, जिल्हा जालना येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. युवतींनो लढायला शिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी युवती काँग्रसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर युवतींनी यावेळी दिली. युवतींनी स्वत: पुढे येऊन लढा देण्याची गरज आहे. मनात कोणतीही भीती न बाळगता हिमतीने संकटाचा सामना करण्यासाठी कंबर कसा, युवतींनो ताठ मानेने जगायला शिका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत येऊन युवतींनी समाजिक कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुलींची छेड काढणाऱ्यांना व अश्लील भाषा करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी एकत्र या, स्त्री शिकली तरच संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. त्यामुळे आजच्या युवती उद्याच्या इंदिरा, प्रतिभाताई पाटील आहेत, उद्याचा देश तुमच्या हाताने घडणार आहे, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे जिद्द आणि चिकाटीने यशस्वी वाटचाल करा. उद्याचे भविष्य तुमच्याच हातात आहे, असे आवाहन सलगर यांनी केले.

माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासारखे उच्चशिक्षित, विकासप्रिय नेतृत्व जालना जिल्हयाला लाभलेले आहे,हे आपले भाग्य आहे. आपण सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून येणाऱ्या काळातही करत राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.


संबंधित लेख