शेतकऱ्यांच्या श्वास घेण्यावर आणि जगण्यावरही कर लावा - धनंजय मुंडे

15 Sep 2018 , 09:29:33 PM

सरकारने आता फक्त शेतकऱ्यांच्या श्वास घेण्यावर आणि जगण्यावरच कर लावणे बाकी ठेवले आहे. उद्योगपतींचे लाखो कोटी रूपये कर्ज माफ करणारे सरकार शेतकर्यां च्या खिशातील पैसे काढून घेण्याचा एकही मार्ग सोडायला तयार नाही, अशा शब्दांत सरकारच्या नवीन भूजल धोरणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 


राज्य सरकारने नवीन भूजल धोरण तयार केले असून त्यानुसार आता शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या विहीरीतील पाणी उपस्यावरही कर द्यावा लागणार आहे. सरकारच्या या धोरणाचा मुंडे यांनी कडाडून विरोध केला आहे. सर्वस्तरावरून शेतकऱ्यांना मारायचे त्यांना संपवून टाकायचे असे सरकारचे धोरण असल्याचे म्हणत त्यांनी सरकारच्या या धोरणावर टीका केली आहे.

संबंधित लेख