अल्पसंख्याक समाजातील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

17 Sep 2018 , 10:51:33 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अल्पसंख्याक समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. प्रत्येक समाजाला इथे न्याय दिला जातो, त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करत आहोत, अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. दरम्यान सुलतान मालदार यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव पद देण्यात आले.

संबंधित लेख