राज्य पुन्हा प्रगतीपथावर येण्यासाठी दादा-ताईंचे लालबागच्या राजाला साकडे

19 Sep 2018 , 05:55:52 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित आणि लोकप्रिय बंधु-भगिनी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सहकुटुंब मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे उपस्थित होते.

अजित दादा व सुप्रिया ताई यांनी महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारावी यासाठी श्रीगणेशाकडे साकडे घातले. राज्य आज आर्थिक संकटात आले आहे, महागाई वाढली आहे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत, बलात्कार - महिला अत्याचारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, राज्यात रोज नवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत, अशा परिस्थितीत राज्याला सावरण्याची गरज आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातली परिस्थिती सुधारावी, अशी प्रार्थना या दोघांनी राज्यातील जनतेच्या वतीने केली.

संबंधित लेख