स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी सरकार शेतकऱ्यांवर खापर फोडतेय - नवाब मलिक

19 Sep 2018 , 09:06:56 PM

राज्य सरकारचे आर्थिक नियोजन नीट नसल्याने राज्यात वित्तीय तूट निर्माण झाली आहे, आर्थिक तुटीला राज्य सरकारचे नाकर्तेपण जबाबदार आहे. सरकारमधील लोक आपले नाकर्तेपण झाकण्यासाठी शेतकऱ्यांवर खापर फोडत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप आमदार अतुल भातकळकर यांना लगावला आहे. मुंबई दौऱ्यावर असलेल्या वित्त आयोगाने मंगळवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे राज्यातील वित्तीय तूट वाढली असल्याचा दावा केला आहे. यावर नवाब मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली, मोठा गाजावाजा करत कर्जमाफी योजनेची जाहिरातबाजी केली, मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशी नाराजी मलिक यांनी व्यक्त केली. हे सरकार घोषणाबाजी करण्यात पटाईत आहे, मात्र सरकारला अमलबजावणी करत येत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

संबंधित लेख