राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

26 Sep 2018 , 07:21:31 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात मुंबई प्रदेशची आढावा बैठक मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत मुंबईच्या नवीन कार्यकारिणीची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी आयटी सेलचे राज्यप्रमुख सारंग पाटील यांच्याकडून पक्षबांधणीच्या ॲपचे विश्लेषण करण्यात आले.

या बैठकीस मुंबई महापालिका विरोधीपक्ष नेत्या राखी जाधव, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, आ. अशोक धात्रक, सोहेल सुभेदार, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले तसेच इतर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख