पेट्रोल, रूपयाने शंभरी गाठल्यावर लोक भाजपलाही शंभर खासदारांवर आणून ठेवेल - जयंत पाटील

26 Sep 2018 , 08:51:36 PM

मुंबईत आज पेट्रोलच्या दराने नव्वदी गाठली आहे. परभणीत हे दर ९२ च्या वर गेले आहेत. मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला महागाईची झळ बसू लागली आहे. मोदी सरकारने जनाची नाही मनाची तरी लाज बाळगावी, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. वाढलेले दर कमी करणे हे सरकारच्या हातात आहे. सेंट्रल एक्साईस कर कमी केले, महाराष्ट्र सरकारने व्हॅल्यू ऍडेड टॅक्स कमी केले आणि मुख्यमंत्र्यांनी मनात आणले तर १५ रु व्हॅल्यू ऍडेड टॅक्स कमी करून जनतेला दिलासा देऊ शकतात. पण सरकारची तिजोरी रिकामी आहे म्हणून सामान्य माणसाच्या खिशात हात घातला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. मला वाटतं की पेट्रोल शंभरी गाठेल, रुपयाही शंभरी गाठेल आणि जनता भाजपला शंभर खासदारांवर आणून ठेवेल, असा टोला त्यांनी हाणला. जगात सर्वांत जास्त पेट्रोल महाराष्ट्रात महाग आहे. लोक भाजपवर प्रचंड नाराज आहेत. जनतेला आता कोणी वाली उरला नाही, अशी भावना लोकांच्या मनात असल्याचेही ते म्हणाले.

संबंधित लेख