संपूर्ण राज्यात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहेत. या मोर्चांमध्ये विविध मागण्यांसह मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणीही प्रमुख्याने होत आहे. यावर आपले मत व्यक्त करताना राज्य सरकारने दोन दिवसांच्या आत मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, असा अल्टीमेटम विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिलाय. मराठा आरक्षणासाठी प्रसंगीकायद्यात बदल करायचा असल्यास विरोधी पक्ष सरकार सोबत असेल हे स्पष्ट करतानाच इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ ...
पुढे वाचानवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरु आहे. विधान परिषदेत गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचा विषय सभागृहात उपस्थित केला. त्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत नगरविकास राज्यमंत्री रंजीत पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती आंदोलनकर्त्यांना केली. सभापती ...
पुढे वाचाराज्यातील जनता दुष्काळाच्या सावटाखाली जगत आहे. पण भाजप मंत्र्यांना मात्र दुष्काळाचे काहीच गांभीर्य नाही. जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन येवला येथे दुष्काळ दौऱ्यावर असताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी सेल्फी काढण्यात व्यग्र होते. जलसंपदा मंत्री सेल्फी काढायला गेले होते की दुष्काळाची पाहाणी करायला? त्यांच्या या कृत्याचा शेतकऱ्यांनी निषेध केला आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या परिस्थितीची महाजन चेष्टा करत आहेत का? ...
पुढे वाचा