राष्ट्रवादी काँग्रेसने केला गांधीविचारांचा जागर, मुंबईत प्रमुख नेत्यांचे मौनव्रत

02 Oct 2018 , 09:10:10 PM

गांधी जयंतीच्या १५० व्या वर्षाचे औचित्य साधून मुंबईत मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या गांधी पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मौन पाळत देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही व सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या  प्रतिगामी धोरणांचा आणि भाजपचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, मुंबई पालिका विरोधी पक्ष नेत्या राखी जाधव, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई महिला युवती अध्यक्षा अदिती नलावडे, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख