राज्यातील अंशकालीन महिला परिचरांच्या समस्यांची खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून दखल

03 Oct 2018 , 07:48:16 PM

अहमदनगर जिल्हा परिषद महिला परिचर महासंघांच्या अंशकालीन महिला परिचरांनी खासदार सुप्रिया सुळे  यांची श्रीगोंदा येथे भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आज सादर केले. खा. सुळे सध्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील विविध समाजघटकांशी संवाद साधत आहेत. या भेटीदरम्यान आपल्या मागण्यांचे निवेदन सुळे यांना सादर करून महिला परिचरांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या.

राज्यामध्ये सुमारे १० हजार ५०० अंशकालीन परिचर आहेत. त्यांच्या कामाची वेळ ९ ते १ अशी निर्धारित असूनही त्यांच्याकडून पूर्ण दिवस काम करवून घेतले जाते, वेतन मात्र अर्ध्या दिवसाचे आणि अत्यल्प दिले जाते, अशी या महिलांची तक्रार आहे. त्यामुळे या गरीब महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सुळे यांना करण्यात आली. सुप्रिया सुळे यांनी अंशकालीन महिला परिचरांच्या या प्रश्नाचा शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी दिली.

संबंधित लेख