अहमदनगर येथे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींनी घेतली खा. सुप्रिया सुळे यांची भेट

03 Oct 2018 , 08:04:08 PM

अहमदनगर येथे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींनी खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन ऑनलाइन औषध विक्रीला त्यांचा विरोध असल्याचे सांगितले. ऑनलाइन औषधविक्रीमुळे गैरप्रकार वाढतील, लोकांना नकली औषधे पुरवली जाऊ शकतात असे मत मांडत त्यांनी निर्णय मागे घेण्याचे निवेदन दिले.

केमिस्ट भवन येथे ही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, सरचिटणीस अशोक बलदोटा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरप्रमुख माणिकराव विधाते, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नगरसेवक विपुल शेटे आणि केमिस्ट मंडळी उपस्थित होते.

संबंधित लेख