खा. सुप्रिया सुळे यांच्या अहमदनगर दौऱ्याची सुरूवात

03 Oct 2018 , 08:32:46 PM

राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या का याचा आढावा घेण्यासाठी खा. राज्यव्यापी दौरा करणार असून या दौऱ्याची सुरूवात अहमदनगर येथून गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली. सुळे यांनी श्रीगोंदा येथे महिला आणि कार्यकर्ते यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. या मतदार संघातून खासदारकीसाठी चांगला उमेदवार मिळवून देणार, अशी ग्वाही सुळे यांनी यावेळी दिली.

यावेळी केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचत आहेत का याची माहिती त्यांनी घेतली. अपंग व ज्येष्ठांना मिळणाऱ्या योजना, गॅस दरवाढ, पेट्रोल- डिझेल दरवाढ, अशा सगळ्या वाढत्या महागाईचे चित्र सुप्रिया सुळे यांनी श्रीगोंदा येथील जनतेसमोर मांडले. सत्तेची व पैशाची मस्ती या सरकारला आली आहे अशी धारदार टीका श्रीगोंदा येथील महिला आढावा बैठकीत सुप्रिया सुळे यांनी मांडली.

संबंधित लेख