पाचोरा येथे खा. सुप्रिया सुळे यांनी साधला पत्रकारांशी संवाद

16 Oct 2018 , 07:02:13 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी पाचोरा येथील महिला मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या भागात केळीला भाव नाही तसेच सरकार दुष्काळ जाहीर करत नाही याबद्दल लोकांमध्ये नाराजी असल्याचे लक्षात आल्याचे सुळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न यावेळी जाणवल्याचेही त्यांनी सांगितले. आघाडी सरकारच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती, या सरकारचे कर्जमाफी करण्यातले नेमके आव्हान काय आहे, हेच कळत नाही, असेही त्या म्हणाल्या.

बेरोजगारांना सरकारकडून खोट्या आशा दाखवण्यात येतात हा विषय गंभीर आहे. यामुळे मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे. बेरोजगार तरुणांसाठी आपल्याकडून काही हालचाल करण्यात यावी अशी मागणी या दौऱ्यात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मॅग्नेटिक महाराष्ट्रात किती गुंतवणूक झाली, किती कंपन्या पुढे आल्या याचा विचार होणे गरजेचे आहे. अशा अनेक योजना समोर आल्या पण त्यासाठी सरकार काहीच हालचाल करत नाही, याबाबत खा. सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

संबंधित लेख