होय, मोदी सरकार ही सुटबूटवाल्यांचीच ! लोकसत्ताच्या जनमत चाचणीत मोदी फेल...

19 Oct 2018 , 06:48:16 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना आणि कामगारांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र यातील एकही आश्वासन सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात पूर्ण केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि अन्य प्रमुख नेत्यांनी वारंवार शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नी केंद्र आणि राज्यातील सरकारला धारेवर धरले आहे. नुकतेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. मोंदीसाठी शेतकरी नव्हे तर अनिल अंबानी, नीरव मोदीच ‘भाई’ अशी टीका त्यांनी यावेळी केली होती. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राने फेसबुक आणि ट्विटरवर घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये वाचकांनी विरोधकांची भूमिका पटत असून मोदींच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान असल्याचे मत नोंदवले आहे.

अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना शेतकऱ्यांवर भले मोठे कर्ज झाले होते. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दुप्पट हमीभाव देण्याची घोषणा केली होती मात्र शेतकऱ्यांच्या पिकांना अद्याप भाव नाही. मध्यंतरी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोंडअळी, मावा, तुडतुड्या या रोगांमुळे त्रस्त होता. सरकारने मदतीची घोषणा केली मात्र अद्यापही शेतकरी मदतीची वाट पाहत आहेत. कामगारांचे प्रश्नीही गंभीर झाले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कामगार कायदा धोक्यात आला असल्याची चिंता खा. शरद पवार यांनी एका मेळाव्यात बोलून दाखवली होती. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे अनेक बडे उद्योगपती बँकांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज बुडवत परदेशी फरार होत आहेत. नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चौक्सी अशी कर्जबुडव्यांची मोठी यादीच आहे, मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे 'होय, मोदी सरकार हे सुटबूटवाल्यांचंच' असं जनतेने म्हणणे स्वाभाविकच आहे.

संबंधित लेख