भारतीय जनता पक्ष हे गुन्हेगारीचे आश्रयस्थान - जयंत पाटील

23 Oct 2018 , 09:14:43 PM

भाजपाची सत्ता येणार नाही अशी सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याचा खून करण्यात आला. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र निषेध केला आहे. भाजप हे गुन्हेगारीचे आश्रयस्थान आहे, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली.

भाजप कार्यकर्त्यांना २०१९ ला केंद्रात व महाराष्ट्रात आपले सरकार येणार नाही, याची कल्पनाही करवत नाही असे जयंत पाटील म्हणाले. काँग्रेस कार्यकर्त्याने सोशल मीडियावर भाजप सरकार येणार नाही अशी पोस्ट टाकली याचा राग धरुन त्या कार्यकर्त्याचा खून करण्यात आला, ही गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे अशी टीका पाटील यांनी केली. भारतीय जनता पक्षात काय सुरु आहे, किती गुन्हेगारी वाढली आहे व गुन्हेगारांचे आश्रयस्थान भारतीय जनता पक्ष झालेले आहे याचे हे उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले. या कृत्याबद्दल भारतीय जनता पक्षाचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असेही ते म्हणाले.

भाजपात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे याचा हा पुरावा आहे. सामान्य जनतेने पोस्ट टाकून पुढील सरकार तुमचे येणार नाही, असे सांगितल्यावर तुम्हाला एवढा राग यावा ही चुकीची गोष्ट आहे, असेही पाटील म्हणाले.

संबंधित लेख