आम्ही कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही - छगन भुजबळ

09 Feb 2016 , 06:44:00 PM

आज अमेरिकेहून परतताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर व कुटुंबियांवर होणाऱ्या आरोपांचे स्पष्टपणे खंडन केले. आपण पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी वॉशिंग्टनला रवाना झालो होतो हे स्पष्ट करत आपल्या पलायनासंदर्भातील अफवांना भुजबळ यांनी पूर्णविराम दिला. 

आम्ही ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करत आहोत. पंधरा वर्षांची कागदपत्रे ईडीने मागितली होती. ती गोळा करण्यासाठी आम्ही वेळ मागितला होता. कागदपत्रे जमा झाल्यावर समीर भुजबळ  यांनी स्वतःहून ईडीला पत्र पाठवून याची माहिती दिली आणि चौकशीला हजर झाले. असे सहकार्य करत असूनही समीर यांना अटक का करण्यात आली, असा सवाल भुजबळ यांनी केला.

आपण निष्पाप असून सर्व सत्य फाईल्समध्ये आहे. ते समोर येऊ द्या असे भुजबळ म्हणाले. अधिकाऱ्यांच्या बदल्या करून वा त्यांच्यावर दबाव टाकून सह्या केल्या जात असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले.

आपल्यावरील आरोप चुकीचे असून महाराष्ट्र सदन बांधकामात कोणताही वाढीव मोबदला आर्थिक वा एसआरए स्वरूपात मोबदला देण्यात आला नाही. तसेच इतर बांधकामांमध्येही भ्रष्टाचार किंवा अनियमितता कशी झालेली नाही, यासंदर्भातील सर्व माहिती भुजबळ यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केली.

या पत्रकार परिषदेचा व्हीडिओ-  https://youtu.be/drgnibjl6Wg

संबंधित लेख