हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा, धनंजय मुंडे यांनी केली मागणी

02 Nov 2018 , 10:17:09 PM

राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. १९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार असून या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज फक्त ९ दिवस चालणार आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून अधिवेशनाचा कालावधी वाढवा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.  


अधिवेशनासाठी देण्यात आलेला हा कालावधी अतिशय कमी असून हा कालावधी वाढवण्यात यावा, असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. राज्यात असंख्य प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक होणे गरजेचे आहे. दुष्काळासारखा गंभीर प्रश्न राज्यासमोर आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा व्हायला हवी. अधिवेशनात चर्चा होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळायला हवा, असेही मत धनजंय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित लेख