खा. शरद पवार यांनी रूग्णालयाला भेट देऊन केली ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या प्रकृतीची विचारपूस

16 Nov 2018 , 09:02:32 PM

आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी खा. शरद पवार यांनी आज आवर्जून लिलावती हॉस्पिटल येथे भेट दिली.

आदिवासी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी श्री. पिचड झारखंड येथे गेले होते. परतीच्या प्रवासात श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र कार्यव्यस्ततेतूनही पवारसाहेब आपल्या सहकाऱ्याला भेटायला आले याचा आनंद मधुकरराव पिचड यांना झाला. आता मी लवकर बरा होईन, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

मधुकरराव पिचड यांना भेटण्यासाठी पवार साहेबांसह पक्षाचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले  व सरचिटणीस शिवाजीराव गर्जे हेही आवर्जून उपस्थित होते.

संबंधित लेख