जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्त आयोजित मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचा सहभाग

23 Nov 2018 , 09:06:50 PM

प्रेषित मुहम्मद यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय खिलाफत कमिटीच्या वतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सहभाग घेतला. १९१९-२० मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या खिलाफत चळवळीच्या काळापासून ही मिरवणूक आयोजित केली जाते. ही मिरवणुक हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. खिलाफत हाऊसपासून हज हाऊसपर्यंत दरवर्षी मिरवणूक काढण्यात येते. याआधी खुद्द महात्मा गांधीजी तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीदेखील ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने निघणाऱ्या या मिरवणुकीचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे या मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा सन्मान असल्याची भावना पवार यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ, वरिष्ठ नेते खा. माजिद मेमन, आ. पंकज भुजबळ, काँग्रेस नेते मिलींद देवरा यांच्यासह इतर समविचारी पक्षांचे नेते आणि विविध धर्मगुरू उपस्थित होते.

संबंधित लेख