भाजपामध्ये गुंडा-पुंडांची भरती - धनंजय मुंडे

08 Dec 2018 , 09:53:37 PM

महानगरपालिका निवडणूक प्रचार सभेच्या निमित्ताने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अहमदनगर येथे जनतेशी संवाद साधला. सरकारने केलेल्या सत्तेच्या गैरवापराचा जमाखर्चच त्यांनी मांडला. पोलिस कर्मचारीही या सरकारच्या राजवटीत त्यांचे कार्यकर्ते म्हणून वावरत आहेत. गुंडगिरीला वाव मिळवण्यासाठी गुंडांना पक्षात सामील करून घेतले जात आहे. हे सरकार लाटेच्या जोरावर आले आणि अशा लोकांना बाजूला सरायलाही वेळ लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरला येऊन गाजरवाटप करत आहेत, पण चार वर्षांत आता त्यांचा हलवा झालाय, असेही मुंडे म्हणाले.

संबंधित लेख