२३ फेब्रुवारीला सांगली कलेक्टर ऑफिसवर राष्ट्रवादीचा भव्य विद्यार्थी मोर्चा, ज्येष्ठ नेते जयंत पाटील करणार मोर्चाचे नेतृत्व

10 Feb 2016 , 02:49:55 PM

राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी इस्लामपूर येथे मंगळवारी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी या मेळाव्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी २३ फेब्रुवारीला सांगली येथील कलेक्टर ऑफिसवर भव्य विद्यार्थी मोर्चा काढण्यात येणार असून स्वतः जयंत पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती संग्राम कोते पाटील यांनी दिली. 

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्कमाफी आणि इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे राज्यभरात आंदोलन छेडले आहे. सतत आंदेलने करूनही जर सरकार या गंभीर प्रश्नाबाबत असंवेदनशील असेल तर मंत्रालयावर २५ हजार विद्यार्थ्यांचा महामोर्चा राष्ट्रवादीतर्फे काढण्यात येईल, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे. 


संबंधित लेख