प्रदेशाध्यक्षांनी घेतली पदाधिकाऱ्यांची शाळा

11 Dec 2018 , 11:14:59 PM

मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे पुढील कार्यक्रम व विभागातील समस्या प्रदेशाध्यक्षांनी जाणून घेतल्या.


या बैठकीस विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते आ. दिलीप वळसे पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. दिपिका चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख