सरकारी जाचाला कंटाळूनच उर्जित पटेल यांचा राजीनामा - जयंत पाटील

12 Dec 2018 , 12:21:13 AM

भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य सुरजीत भल्ला यांनीही राजीनामा दिला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी अर्थकारणाकडे दुर्लक्ष करून वाटेल तसे निर्णय घेते आहे. रघुराम राजन यांनाही भाजपानेच घालवले होते. भारतातल्या स्वायत्त संस्थांमध्ये सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप वाढतो आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. रिजर्व्ह बँकेच्या साठ्यातुन पैसे काढण्याचा डाव केंद्र सरकारने आखला होता. रिजर्व्ह बँकेने तो हाणून पाडल्याने गव्हर्नरांवर दबाव आणण्याचं काम सरकारने केलं. म्हणूनच उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला, असेही जयंत पाटील म्हणाले.


पहा - https://goo.gl/pE4FZA