राज्यसरकारने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता योजना बंद करण्यास राष्ट्रवादीचा विरोध

10 Feb 2016 , 05:17:03 PM


संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही यशस्वी योजना स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने राज्यात सुरू करण्यात आली होती. तिला राज्यातील गावागावांमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील गावागावांमधून ही योजना यशस्वीपणे राबवण्यात आली. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक असून राष्ट्रवादीचा त्याला तीव्र विरोध आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे.  

मोदी सरकार आल्यापासून जुन्या योजनांची नावे बदलून त्याच योजना पुन्हा जनतेसमोर आणण्याचे काम सुरू आहे. युपीए सरकारच्या काळात सुरु केलेल्या निर्मल ग्राम योजनेचे नाव बदलून स्वच्छ भारत अभियान असे करण्यात आले. आता महाराष्ट्र सरकारही केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकते आहे. संत गाडगेमहाराजांपेक्षा मोदी मोठे होऊ शकत नाहीत. जी योजना लोकसहभागातून पुढे आली, यशस्वी झाली ती योजना या सरकारने पुन्हा सुरु करावी, असे मलिक म्हणाले. 


संबंधित लेख