पारदर्शी मुख्यमंत्र्यांनीच लपवली माहिती, गुन्हेगारी खटले लपवल्याबद्दल सुप्रिम कोर्टाची नोटिस

13 Dec 2018 , 10:54:58 PM

पारदर्शी कारभाराच्या बाता मारणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही असणारे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती लपवल्याचं आता उघडकीला आलं आहे. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी गुन्ह्यांचा उल्लेखच केलेला नाही. या दोन प्रकरणांची माहिती फडणवीस यांनी चक्क लपवली आहे. मतदाराला उमेदवाराविषयी पूर्ण माहिती जाणून घेण्याचा हक्कच असतो. हा हक्कच फडणवीस यांनी पायदळी तुडवला आहे. यामुळे फडणवीस यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिकाच कोर्टात झाली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांना थेट सुप्रिम कोर्टानंच नोटिस बजावली आहे. मुख्यमंत्री स्वतःचा कारभार पारदर्शक असल्याचं सांगतात. मग दोन गुन्हे लपवण्याची वेळ त्यांच्यावर आली? थेट प्रतिज्ञापत्रात खोटं बोलूनही त्यांचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी कसा??

मुख्यमंत्री #जवाबदो…!

संबंधित लेख