गरीब-श्रीमंत दरी रुंदावली

21 Jan 2019 , 07:20:47 PM

ऑक्सफॅम या जागतिक मान्यताप्राप्त संस्थेच्या अहवालानुसार भारतामध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी दिवसेंदिवस वाढत चाललीये. गेल्या वर्षात अब्जाधीशांच्या यादीत भारतातून १९ व्यक्तींची भर पडली आहे. आता देशात एकूण ११९ अब्जाधीश आहेत. या ११९ जणांकडे मिळून २८ लाख कोटींची संपत्ती आहे. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार २०२२पर्यंत भारतात आणखी ७० अब्जाधीश असतील. श्रीमंतांची श्रीमंती ३९ टक्क्यांनी वाढली असताना भारतातल्या गरिबांच्या कमाईत झालेली वाढ अवघी ३ टक्के आहे. सरकार शिक्षण, आरोग्यावर खर्च करत असेल, आर्थिक सोयी-सुविधा देत असेल, तरी त्याचा लाभ मूठभरच घेऊ शकतात, हे धोरणात्मक अपयशच हा अहवाल अधोरेखित करतोय.


संदर्भ - https://bit.ly/2W7rOot