भाषिक अल्पसंख्यांकांचा जनाधार राष्ट्रवादीकडे आणण्याचा निर्धार...

19 Feb 2019 , 08:06:42 PM

राष्ट्रवादीच्या भाषिक अल्पसंख्यांक विभागाचा पहिला मेळावा पार...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाषिक अल्पसंख्यांक विभागाचा पहिला मेळावा प्रदेश कार्यालयात पार पडला. भाषिक अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मुकेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा घेण्यात आला. यामध्ये गुजराथी, सिंधी, साऊथ इंडियन हे सेल सहभागी झाले होते. अल्पसंख्यांक विभागाने भाषिक अल्पसंख्यांकांचा जनाधार राष्ट्रवादीकडे वळविण्याचा संकल्प यावेळी केला.

यावेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

या मेळाव्यात पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, भाषिक अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मुकेश गांधी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहिद जवानांच्या कुटुंबियांना काही मदत जमा करण्यात आली. या मेळाव्याला प्रदेश चिटणीस संजय बोरगे, साऊथ इंडियन सेलचे अध्यक्ष सुंदर नायडू, गुजराती सेलच्या अध्यक्षा दिपाली दलाल, मुंबई गुजराती सेल अध्यक्ष मुकेश सोनी उपस्थित होते.

संबंधित लेख