राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सोशल मीडिया बैठक संपन्न

14 May 2019 , 04:28:00 PM

राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया समन्वयकांनी येत्या काळात उत्स्फूर्तपणे काम करावे. जिल्ह्यातील शेवटच्या माणसापर्यंत राष्ट्रवादीचे विचार पोहोचायला हवे अशी व्यवस्था निर्माण करावी. समन्वयकांनी राज्य सरकारची फसवी निती लोकांसमोर मांडावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, चिटणीस संजय बोरगे, प्रवक्ते महेश तपासे, क्लाईड क्रास्टो, युवकचे सुरज चव्हाण, रविकांत वर्पे, अभिषेक बोके आणि समन्वयक उपस्थित होते.

संबंधित लेख