मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावालाच पाणी टंचाईच्या झळा...

14 May 2019 , 04:49:21 PM

जे आपलं घर सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार? ही म्हण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अगदी योग्य जुऴते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील हलगरा हे गाव दत्तक घेतलं आहे. त्यामुळे गावाचा विकास होईल आणि पाणीटंचाईची समस्या दूर होईल असा गावकऱ्यांचा समज होता. मात्र झालं उलटंच.. गावकऱ्यांना आणखीनच समस्यांना सामोर जावं लागतंय. मुख्यमंत्र्यांनी गावात ३६ मिनी वॉटर योजना, २१ विंधन विहिरी, अशा योजना सुरू केल्या, मात्र आजमितीला त्यातील दोनच मिनी वॉटर योजना आणि एक विंधन विहिर वापरात आहेत. गावातील सर्वच पाणी स्त्रोत बंद पडले असून गावात तीन दिवसात एकदा पाणी पुरवठा होतो. गावाकडून जानेवारी महिन्यातच चार बोअर, विहिर अधिग्रहण व एका टँकरची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली होती. मात्र अजुनही त्यावर काहीही अमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाकडेच जर मुख्यमंत्री लक्ष देऊ शकत नसतील तर संपूर्ण महाराष्ट्राबाबत बोलायलाच नको, असं म्हणावं लागेल.

संबंधित लेख