हा दुष्काळ दौरा की शेतकऱ्यांची क्रूर थट्टा?

14 May 2019 , 07:38:00 PM

राज्यातील जनता दुष्काळाच्या सावटाखाली जगत आहे. पण भाजप मंत्र्यांना मात्र दुष्काळाचे काहीच गांभीर्य नाही. जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन येवला येथे दुष्काळ दौऱ्यावर असताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी सेल्फी काढण्यात व्यग्र होते. जलसंपदा मंत्री सेल्फी काढायला गेले होते की दुष्काळाची पाहाणी करायला? त्यांच्या या कृत्याचा शेतकऱ्यांनी निषेध केला आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या परिस्थितीची महाजन चेष्टा करत आहेत का?

संबंधित लेख