रद्द कर योजनेच्या माध्यमातून सरकारचा १३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार..

15 May 2019 , 03:34:05 PM

भाजपा सरकारने सत्तेत आल्यापासून सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारत, फक्त आपली तिजोरी भरण्याचे काम केले आहे. विरोधी पक्षात असताना भाजपने वस्तू आणि सेवा कर (GST) कायद्याला विरोध केला. सत्तेत आल्यावर मात्र त्यांनी घुमजाव करत जीएसटी लागू केला आणि ‘वन नेशन वन टॅक्स’ म्हणत एक इतर सर्व कर रद्द केले. मग ‘कृषी कल्याण अधिभार’ (KKC) या रद्द करण्यात आलेल्या योजनेतून कर वसुली कशी काय करण्यात आली? आणि ही वसुली थोडी-थोडकी नाही, तर तब्बल १३०० कोटी रुपयांची आहे. जुलै २०१७ नंतरही हा कर गोळा केल्याची माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरामुळे उघड झाली.कर वसुलीच्या नावाखाली सामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या भाजपा सरकारला लाज कशी वाटत नाही?

संबंधित लेख