मोदींची थाटामाटात ज्ञानसाधना...

20 May 2019 , 03:57:38 PM

लोकसभा निवडणुकांचा प्रचार संपताच मोदींनी केदारनाथ गाठले. या केदारनाथ दौऱ्यात मोदींनी एका गुहेत ज्ञानसाधना ही केली. या ‘साधने’तून त्यांनी काय साध्य केले त्यांचे त्यांनाच ठाऊक... मात्र अपेक्षेप्रमाणे सगळे कॅमरे तिकडे वळले.... त्यामुळे जाणीवपूर्वक प्रसिद्धीत राहण्याची त्यांची साधना मात्र परत एकदा फळाला आली.. पूर्वीच्या काळी साधुसंत घोर तपश्चर्या करायचे.. मोदींची तपश्चर्या मात्र मोठ्या थाटामाटात पार पडली.
मोदींना गुहेत मिळालेल्या सुखसुविधा
ही गुहा केदारनाथ मंदिरापासून साधारण २ किमी अंतरावर तयार करण्यात आली आहे. या गुहेत काही आवश्यक सुविधाही देण्यात आल्या आहेत. गुहेत बेड, टॉयलेट, वीज आणि टेलिफोनसारख्या आधुनिक सुविधा आहेत. असो ! उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत.. पंतप्रधानांप्रमाणे तुम्हाही सुट्टीत अशी ज्ञानसाधना करण्याचा प्लान करू शकता बरं का..

संबंधित लेख