सरकारच्या असंवेदनशीलतेचा कळस..

20 May 2019 , 05:45:35 PM

महाराष्ट्रात बळीराजावर दुष्काळाचं सावट पसरलेल असताना हे असंवेदनशील सरकार आणि मंत्री मात्र वारंवार शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळायचं काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे एसीमध्ये बसून दुष्काळाचा आढावा घेतला, तर दुष्काळ दौऱ्यावर असलेले मंत्री तर आपण पर्यटनासाठी फिरत असल्यसारखे वागत आहेत. आता त्यात भर म्हणून की काय, राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी कर्ज घेऊन दुसऱ्या बॅंकांमध्ये फिक्स डीपॉझीट करतात, असं वक्तव्य करत शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळले आहे. जळगाव जिल्ह्यातील १५०१ गावं दुष्काळाच्या छायेत असताना चंद्रकांत पाटील यांनी केवळ ९ गावांचा धावता दुष्काळी दौरा केला. शेतकऱ्यांची अशी थट्टा करताना महसुलमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही?

संबंधित लेख