निवडणूक संपली, नमो टीव्हीने गाशा गुंडाळला!

22 May 2019 , 03:26:40 PM

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वादळ देशात निर्माण करण्यासाठी भाजपा सरकारने नमो टीव्हीची कल्पना आणली. यातून भाजपाच्या झोळीत पडणाऱ्या सर्व गोष्टी देशात झळकवण्याचे काम झाले. विरोधकांनी यावर आवाज उठवला तरी याकडे कानाडोळा करण्यात आला. निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पाडल्यावर हा टीव्ही बंद कसा पडला. यातून भाजपाने नमो टीव्हीच्या तंबूचं भाड निवडणुकीपुरतंच दिल्याने तंबू गुडाळला गेल्याचे स्पष्ट होते. पक्षाची टिमकी वाजवण्यासाठी हा घाट घालण्यात आला की काय? तसेच यातून लोकांची दिशाभूल झाल्याची शंका नाकारता येत नाही. सरकारच्या नौटंकीचे काम करणाऱ्या या टीव्हीवर निवडणूक आयोगाने नोटीस पाठवूनही काम सुरू होते याचे नवलच म्हणावे.

संबंधित लेख