दुधाच्या दरात वाढ, दूध उत्पादक शेतकरी मात्र संकटात

22 May 2019 , 05:50:02 PM

सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका राज्यात अनेक घटकांना बसतोय. दुधाच्या बाबतीतही सरकारला धोरण लकवा झाला असावा. त्यामुळे दूध उत्पादकांवर संकटाचे ओझे वाढले आहे. संपूर्ण राज्य दुष्काळाच्या झळा सोसत आहे. त्यामुळे शेतकरी दूध उत्पादनाकडे वळत आहेत. जळालेली पीके व झालेल्या नुकसानातून मार्ग काढण्यासाठी दूध उत्पादन करूनही दूध उत्पादकाला याचा फायदा मिळत नाही ही शोकांतिका आहे. कारण दुधाच्या किमतीत वाढ होत आहे त्याचा फायदा खासगी कंपन्यांना होत आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात सरकारविरोधी प्रचंड नाराजी आहे. दुष्काळी भागात चारा छावण्यांची मागणी करूनही त्याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही आहे.

संबंधित लेख