दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम महिलांवर..

27 May 2019 , 07:31:54 PM

सबंध महाराष्ट्रात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम महिला आणि लहान मुलांवर होत आहे. महिलांना पाण्यासाठी रोज सहा-सात तास भटकंती करावी लागतेय. पाणी भरण्याच्या सततच्या ताणामुळे आणि डोक्यावरून पाणी वाहून आणावे लागत असल्यामुळे महिलांना मानेच्या आणि कमरेच्या मणक्यांचे आजार जडले आहेत. इतकेच नव्हे तर, दुष्काळाच्या परिणामांची व्याप्ती लहान मुलांपर्यंत येऊन ठेपली आहे. अनेक लहान मुले कुपोषित होऊ लागली आहेत. राज्य महिला आयोगाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच लहान मुले, महिलांच्या आरोग्याविषयी आलेल्या समस्या दूर करण्यासाठी महिला आयोगाने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी देखील मागणी त्यांनी केली. त्यामुळे आतापर्यंत बघ्याची भूमिका घेणाऱ्या या सरकारने निदान महिलांचा जगण्यासाठीचा संघर्ष पाहून तरी तातडीने पावले उचलावीत.

संबंधित लेख