नवनियुक्त युवक प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्ष महाराष्ट्र पिंजून काढणार!

09 Jun 2019 , 04:52:42 PM


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई प्रदेश कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत युवकांचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, रविकांत वर्पे यांची निवड करण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात युवक मेळावा संपन्न झाला. यावेळी युवकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभेला संबोधित केले. राज्यभरातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन युवकांच्या या त्रिकुटाने महाराष्ट्र पिंजून काढायला पाहिजे अशी जयंत पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांवर एक भुरळ घातली आहे. या परिस्थितीत अशा युवकांचे मतपरिवर्तन घडवण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख