१३ जूनपासून मुंबई प्रदेश कार्यालयात मॅरेथॉन बैठका..

11 Jun 2019 , 05:27:29 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार १३ जून ते १५ जून या कालावधीत मुंबई प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून रोजी २० वा वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पवार साहेबांनी जिल्हानिहाय बैठका घेणार असल्याचे जाहीर केले.

या मॅरेथॉन बैठकांना पक्षातील ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ,  माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे हे नेतेदेखील उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हानिहाय बैठकांना संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार, नेते, पदाधिकारी हेदेखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

संबंधित लेख