खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्हानिहाय आढावा बैठकांचा दुसरा टप्पा संपन्न

24 Jun 2019 , 03:26:12 PM

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आढावा बैठकांचा दुसरा टप्पा आज संपन्न झाला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी या बैठकांना हजेरी लावत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विचारमंथन केले.

आज मराठवाडा विभागातील असलेल्या औरंगाबाद, गंगाखेड, बीड, जालना, हिंगोली, वर्धा, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील लेखाजोखा पवारसाहेब व ज्येष्ठ नेत्यांसमोर मांडला.

या बैठकांना प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनील तटकरे, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, आ. राणाजगजीतसिंह, आ. राजेश टोपे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख